डॉ. बशिरे यांच्या आंदोलनाला यश लोणारचे धारतीर्थ स्नानास खुले

Khozmaster
1 Min Read
ज्ञानेश्वर सुपेकर
लोणार .-डॉ. गोपाल बशीरे (बच्छिरे) यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्या नंतर जिल्हा प्रशासन व पुरातत्त्व विभाग खडबडून जागे झाले आणि त्यांनी आज 12 डिसेंबर 2023 रोजी लोणारचे विरज धारतीर्थ हे तीर्थस्नानासाठी खुले केले
डॉ. गोपाल बशीरे यांनी 22 नोव्हेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच नागपूर येथील अधीक्षक पुरातत्त्व विभाग यांना निवेदनाद्वारे, जर लोणारचे विरज धारतीर्थ हे 12 डिसेंबर पूर्वी म्हणजेच लोणी यात्रा महोत्सवा पूर्वी तीर्थस्नानासाठी खुले केले नाही तर लोणार धार तिर्थासमोर आत्मदहन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने बुलढाणा जिल्ह्याचे संघटक प्रा. डॉ. गोपाल बशिरे यांनी दिला होता
त्यानंतर जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभाग खडबडून जागे झाले आणि १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुरातत्त्व विभाग व जिल्हाधिकारी यांनी स्नानासाठी खुले करण्याचे आदेश पारित केले. जे आमदार खासदार करू शकले नाही ते एका शिवसैनिकांनी करून दाखवले यामुळे समाजातून डॉ. बशीरे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे तसेच महाराष्ट्रातील सर्व श्रद्धांनी तीर्थ स्नानासाठी लोणार नगरीत यावे असे आवाहन डॉ. बशिरे यांनी केले
0 9 3 8 5 6
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *