छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,१२
राजपूत/परदेशी समाजाच्या युवक/युवतींनी आपला मनाजोगा जीवनसाथी निवडण्यासाठी श्री,सदगुरू कानिफनाथ महाराज बहुउदेशीय सेवाभावी संस्था द्वारा छत्रपती संभाजीनगर येथे रविवार(ता,०७)रोजीआयोजित वधू-वर परिचय संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ,दिनेश परदेशी यांनी मंगळवार(ता,१२)रोजी वैजापूर येथे केले,या नियोजित संमेलनाचे आयोजक सर्वश्री नारायणसिंह मरमट,लालचंद जऱ्हाडे,आनंदसिंग बारवाल,विजयसिंग लोधवाल,मंगलसिंग सिंगल यांनी डॉ,परदेशी यांची वैजापूर येथे भेट घेतली व त्यांना निमंत्रण दिले ,तेंव्हा डॉ,परदेशी बोलत होते, संमेलन ठिकाण वासंती मंगल कार्यालय बीड बाय पास रोड, छ, संभाजीनगर आहे वेळ सकाळ ९ते,सायं५अशी आहे,या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजुसिंग राजपूत,मुख्याधिकारी भागवत बिघोत (राजपूत)व सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत,भाजपा चे माजी तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे पाटील, कल्पना पवार, यांची उपस्थिती होती
Users Today : 18