शासन आपले दारी शिबिराचे ग्रामपंचायत देवळी पेंढरी येथे यशस्वी आयोजन!

Khozmaster
1 Min Read

संगीता तायडे
(दै, खोजमास्टर)
हिंगणा तालुका, नागपूर.नागरिकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या महाराष्ट्र शासनाच्या उदात्त हेतूने सुरु करण्यात आलेला उपक्रम शासन आपल्या दारी  शिबिराचे आयोजन दिनांक 08.12.2023 रोजी हिंगणा तहसिलदार.प्रियदर्शिनी बोरकर यांचे मार्गदर्शनात हिंगणा तालुक्याच्या टोकावर असलेले गाव देवळी पेंढरी येथे  तहसील कार्यालय हिंगणा यांचे  पुढाकाराने  करण्यात आले. शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी महसूल विभागामार्फत 7/12 वाटप,नव मतदार नोंदणी,राशन कार्ड नोंदणी,तसेच सेतू केंद्र मार्फत आधार कार्ड नोंदणी, कृषी विभाग मार्फत रब्बी हंगाम बाबत पूर्वतयारी तसेच ग्राम पंचायत मार्फत जन्म मृत्यू नोंदणी,विवाह नोंदणी आणि आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी व आयुष्मान भारत  कार्ड नोंदणी इत्यादी सेवा पुरविण्यात आल्या.
या प्रसंगी देवळी पेंढरी चे सरपंच.मधुकर तेलंग, माजी सरपंच  व सामाजिक कार्यकर्ता विठ्ठलराव घोंगडे,उपसरपंच  चंद्रशेखर उरकुडे ,पंचायत सदस्य सुनिल वडमे,संदीप मोदनकर पोलीस  पाटील तसेच  शेतकरी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी  आर.एम.डांगाले, तलाठी अरुण गडपायले,ग्रामसचीव  व्ही.के.उमाटे यांनी विशेष प्रयत्न केले.

0 9 3 8 5 6
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *