शिरूर प्रतिनिधी: फैजल पठाण
नेशनल ह्यूमन राइट अँड ह्युमेनिटेरियन फेडरेशन
चे अध्यक्ष – अब्दुल जब्बार शेख यांच्या वतीने प्रख्यात समाजसेवक अब्दुल लतीफ बाबा यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे भिवंडी शहर येथे
प्राइड ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून गांधीवादी विचारवंत
डॉ. प्रोफेसर राम पुनियानी
आणि स्पष्टवक्ते
सामाजिक कार्यकर्ता
श्री.विनय दुबे उपस्थित होते. समाजासाठी चांगले काम करणाऱ्या आणि मानवतेसाठी काम करणाऱ्या निवडक व्यक्तींना
*मानवतेचा गौरव पुरस्कार* प्रदान करण्यात आला. डॉ. नितीन सोनवणे यांनी मानवाधिकारच्या माध्यमातून मागील 5 वर्षांमध्ये अनेक प्रश्न मार्गी लावले त्यामध्ये गोरेगांव मुंबई येथील आरे जंगल झाडे तोडण्यावर केद्रं सरकार ला पत्र व्यवहार करुन बंदी आणली होती – सरकारी शाळांना अधिक प्राधान्य देवून उच्चतम शिक्षण चालू करण्यासाठी प्रयत्न, शेतकऱ्यांची कर्ज माफी साठी सरकारला पत्रव्यवहार केला, पूरग्रस्त लोकांना मदतीची मागणी, कोरेगाव भीमा,वढू ते पाबळ रस्त्याची मागणी केली होती, वाढती गुन्हेगारी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारा वर कडक कायदा बनवण्याची राज्यसरकार कडे विशेष मागणी केली अशा अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शोएब गुड्डू, समाजवादी नेते
रियाझ आझमी,
भिवंडीचे प्रसिद्ध उद्योगपती व कामगार नेते छगन पाटील, अब्दुल रहमान रझवी, इम्रान शेख, उपासना उपाध्याय,
माजी नगरसेवक
इस्माईल मिर्ची,
डॉक्टर के आर खरात,
जगदीश पाटील,
सामाजिक कार्यकर्ते तरुण मिश्रा,
आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सज्जाद अख्तर आणि इक्बाल सिद्दीकी यांनी केले.
Users Today : 18