जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
रोजी महावितरण विभाग भुसावळ या कार्यालयाला केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार प्रविण विजय तायडे यांनी काही माहितीची मागणी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज देऊन केली होती. ती माहिती जन माहिती अधिकारी तथा उप कार्यकारी अभियंता पहूर यांनी सबंधित शेंदुर्णी कक्ष अभियंता यांना वाचवण्यासाठी मागितलेली महत्वाची माहिती न देता, दिशाभूल करणारी अपुर्ण माहिती दिली.
सदर दिलेली दिशाभूल करणारी माहिती अशी की ,जुन महिन्यामध्ये पाचोरा शेंदुर्णी वाकडी स्टेट हायवे साठी पब्लिक वर्क डिपार्टमेंट यांच्या कामासाठी संत सत्रमदास इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.यांनी 1.3% या द्वारे कामाची मंजुरी मिळवल्याची माहिती दिली, व या माहिती नुसार सदर ठिकाणी पडताळणी केली असता,त्या ठिकाणी 11/कि.व्हो.विद्यूत वाहिनीचे नवीन खांब बघायला मिळतात मात्र नवीन विद्यूत तारा बघायला मिळत नाहीत व सुरक्षेच्या दृष्ठिकोनातून वापरण्यात येणारी गार्डिंग देखील त्या ठिकाणी नसल्याचे समोर आले, हा सर्व प्रकार बघून शेंदुर्णी पहूर विभागात कागदावर नियमाने दिसणारे कामे देखील प्रत्यक्षात बेकायदेशीर होत असल्याचे चित्र समोर येत आहे,व आपल्याच भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी स्टेट हायवे चे मंजुरीचे पत्रक जे की स्टेट हायवे पासून पंधरा मिटर अंतरापर्यंत मर्यादित असते त्याचा नगर पंचायत हद्दीतील मागितलेल्या माहिती मध्ये तिळमात्र सबंध येत नाही, ती माहिती अशा अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी दिली जाते जो अधिकारी कामावर हजर राहत नाही नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करतो व हजेरी बुकात एकाच वेळेला आठ दहा दिवसाच्या हजेरी भरून घेतो व त्याच्या वरिष्ठाचे इतरांवर लक्ष असते मात्र या व्यक्तीवर लक्ष राहत नाही या अधिकऱ्याला वाचवण्यासाठीच वरिष्ठ अधिकारी माहिती अधिकारात दिशाभूल करणारी माहिती पुरवत असेल तर हा संपूर्ण प्रकार बघता या गोष्टीला पहूर उप विभागाचे अधिकारी तर खत पाणी घालत नाहीत ना? असा ही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना बघायला मिळत आहे.
या महावितरण विभागातील ही भ्रष्टाचाराची साखळी अजून लांब आहे.? हा देखील चौकशीचा भाग असून सबंधित महावितरणाचे वरिष्ठ अधिकारीच एकमेकांना वाचवत असल्याचे समोर येत असून,पहूर उप विभागातील एकूण कामांची चौकशी करणे गरजेचे ठरत असल्याने, माहिती अधिकार कार्यकर्ते तथा पत्रकार प्रविण विजय तायडे हे महावितरण विभागाचे मुख्य कार्यालय प्रकाशगड या कार्यालयाशी पत्र व्यवहार करणार असून गरज पडल्यास न्यायालयात देखील जाणार असल्याची माहितीही,माहिती अधिकार कार्यकर्ते तथा पत्रकार प्रविण तायडे यांनी वृत्तपत्रांशी बोलताना दिली.
Users Today : 22