माजी आमदार वै. श्री दिगंबर (दादा) बाळोबा भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आज इंदोरी, मावळ (पुणे) येथे त्यांच्या स्मारकाचे लोकार्पण केले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे जी, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आ. उमाताई खापरे, आ. राहुल कुल, ह. भ. प. समाधान महाराज, बाळा भेगडे व भेगडे कुटुंबीय व मान्यवर उपस्थित होते.
मावळ प्रदेशाला कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मोठी परंपरा लाभलेली आहे. याच परंपरेला साजेसे मुल्याधिष्टीत राजकारण दिगंबरदादा यांनी केले. ‘पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी’ या नार्यावर ते निवडून आले परंतु विधानसभेत देखील ते ‘पंढरीचे वारकरीच’ राहिले. जीवनात पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यावर आपले ‘वारकरीपण’ टिकवणे कठीण, परंतु त्यांनी आपल्यातला हा वारकरी टिकवून ठेवला.
जनतेच्या सेवेसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले होते. आमदार नसतानाही जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा ते नेहमीच करत राहिले. अनेक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर त्यांनी काम केले. मात्र त्यांनी हाती घेतलेली जी कामे अपूर्ण राहिली आहेत, अशी कामे पूर्णत्वास नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील.ही कामे पूर्ण करणे, हीच दिगंबर दादांना खरी श्रद्धांजली ठरेल!
Ramesh Chavhan
KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
Users Today : 40