उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बु. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणीपुरवठा योजना, रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल, मुळा-मुठा नदीवरील पुलांच्या विविध विकासकामांची पाहणी केली.
मांजरी बु. परिसरातील पाण्याची समस्या लक्षात घेता मांजरी नळ पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी तसेच योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी महानगरपालिकेने तात्काळ नळ जोडणीची कार्यवाही सुरू करावी अशा सूचना ना. अजितदादांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते ससाणेनगर येथील सावित्रीबाई फुले आयुष्मान आरोग्यवर्धनी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.
Users Today : 40