प्रिये……!
बेजीव कोरड्या खडकावरती तू आशेचा पाझर प्रिये,
मी घेतो हिरवळ प्रेमात तुझ्या तू श्रावणाची बरसात प्रिये,
मी एक पाखरु पिंजऱ्यात जणू,
तू निळशार आकाश प्रिये,
मी रात अंधारी वाट जशी
तू तारकांचा प्रकाश प्रिये,
मी नभ सावळा आभाळ दाटून,
तू गार प्रीतीचा वारा ,
मी दिशाहीन एक तटनी ,
तू सागराचा किनारा,
मी कमळा मधला भ्रमर ,
तू रुंझु मुंझु पहाट आहे,
मी भिरभिरणाऱ फुलपाखरू,
तू फुलझाडी घनदाट आहे,
हिरवळ झाली ही धरणी,
फुलून नाचती मोर पिसारा
प्रेम ओतण्या प्रीत वारे,
घेऊन वाहती पावसाचा शहारा,
असेच माझे चकोर नयन,
तू त्यांचा चंद्र तारा,
मी सुगंध शोधणारा कस्तुरी हरीण ,
अन् तू हृदयाचा दरवळ सारा…..
कवी :- (शून्य) सुमित तायडे