दिपक मापारी @ वाशिम :- राज्यकर्ते फक्त आपल्याच सत्तेचा मेळ बसविण्यात रममाण झाल्याने शेतकरी मात्र उत्पादीत मालाच्या हमी भावापासुन आजही कोसोदुर आहे.याला कारणीभुत सरकारचे दुटप्पी धोरण आणि विखुरलेला शेतकरी वर्ग जबाबदार आसल्याचे विचार स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष दामुआण्णा इंगोले तालुक्यातील भर जहागीर येथिल जाहीर सभेत विचार मांडले,आजच्या सरकारचे धोरण म्हणजे ‘शेतकरी मेला तरी चालेल परंतु कोंबड जगल पाहीजे’ आशा प्रकारची विचित्र परीस्थिती निर्माण केली आसल्याने ते बोलले.
तालुक्यातील भर जहागीर येथिल रतननाथ महाराज संस्थानच्या प्रांगणामध्ये ग्रामस्थांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष दामुआण्णा इंगोले यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक डाॅ.श्रीराम गरकळ होते.प्रमुख मार्गदर्शक स्वाभीमानीचे नेते दामुआण्णा इंगोले होते.प्रमुख उपस्थितीत बळीरामजी चोपडे,वैभव जाधव,अविनाश बिल्लारी,जिल्हाध्यक्ष गोपाल पाटील खडशे,रिसोड बाजार समिती संचालक रविंद्र परशराम चोपडे,भगवान चोपडे,तंटामुक्त अध्यक्ष मारोती जायभाये,प्रकाश तात्या चोपडे,नितीन आप्पा जिरवणकर,यांची उपस्थिती होती.यावेळी शेतकरी वर्ग उत्पादीत मालाच्या कोसलत चाललेल्या परीस्थितीने वैतागलेला आहे.उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त होत आसुन सन 2023 मधील सोयाबिनचे प्रति क्विंटल चे दर 2023 पर्यत जैसे थे आहेत.आणि शेतपिकाच्या लागणा-या बि-बियाणे,रासायनिक खते,औषधी,निंदणी,खुरपणी,डवरणी, वखरणी,सोंगणी हा खर्च उत्पादीत शेतीमालाच्या दुप्पट झालेला आहे.तरी सुध्दा नेते फक्त आपल्याच सत्तेसाठी जुळवा,जुळव करीत आहेत.वाशीम जिल्हा सोयाबीन पट्टा म्हणुन ओळखल्या जातो.परंतु येथिल शेतकरी हा सोयाबीन मुळेच डबघाईस जात आहे.शासणाचे मात्र सपसैल दुर्लक्ष आहे.पिक विम्यासाठी कंपनी आणि सरकार विरोधी धोरणा संदर्भात दररोज रस्त्यावर उतरावे लागते.येत्या नविन वर्षात शेतकरी नेते राजु शेट्टी यांच्या माध्यमातून ‘एकच नारा शेतक-यांचा सातबारा कोरा’ हा नारा राहणार आसल्याचे सांगीतले.यावेळी संचालक डाॅ.गरकल यांनी सुध्दा पिकविम्या संदर्भात मार्गदर्शन केले,तर प्रा.अशोक गंगावणे यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅक शेतक-यांची कर्जाच्या पैशावर शेर च्या नावाखाली लुट करीत आसल्याचा आरोप आपल्या भाषणातुन व्यक्त केले.यावेळी स्वाभीमाणी शेतकरी संघटनेचे नितीन आप्पा जिरवणकर,भानुदास गिते,गजानन सानप,मदन चवरे,यांच्यासह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन प्रकाश तात्या चोपडे यांनी केले तर आभार नितीन आप्पा जिरवणकर यांनी मानले..
Users Today : 14