वर्षाखेर..
केले नाही काम ते
सरली सारी हयात
उडू लागे लग्न घाई
वाटले आले वयात
मार्चएडींगची कामे
चालते जोरजोरात
बीले पास कर बाबू
रे दलालांची वरात
सारे व्यस्त अस्वस्थ
तिष्ठत उभे दारात
झोप न अधिका-यां
फाईली न्या रे घरात
गरोधर गच्चपाकीटे
जागा पुरेनाखिशात
तुरूरू फाईल पळे
रेस लागली जोशात
कायदेकानून सगळे
गुंडाळू ठेवा गोशात
शर्यती रे लागलेल्या
कासव अन् सशात
अडू नका वाटानोटा
पाय नको रे पायात
वेळ नाही जेवायला
हात गुंतलेतं सह्यात
– हेमंत मुसरीफ पुणे.