ब्रह्मचैतन्य कथामृत चे नागपुरात प्रथमच आयोजन

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी, ज्योती दीपक मुदलियार, नागपूर.श्री ज्ञानेश्वर मंदिर, बजाज नगर (अभ्यंकर नगर पेट्रोल पंप मागे) नागपूर येथे
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त हया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात ३१ डिसेंबर २०२३ला सकाळी ८.०० वाजता श्रीराम शोभा यात्रेने झाली. पीत वस्त्र परिधान केलेली ही शोभायात्रा संत ज्ञानेश्वर मंदिरातून निघून श्रीराम मंदिर, बजाज नगर पर्यंत काढल्या गेली होती.
हा कार्यक्रम ७ जानेवारी २०२४ पर्यंत चालणार असून यात दररोज सकाळी ७ ते १० वाजे पावतो ब्रह्मचैतन्य कथामृत तर सायंकाळी ५ ते ८ पर्यंत श्रीराम कथेचे सादरीकरण होईल. वेदमूर्ती अनंत शास्त्रीय मुळे (गोंदीकर) आळंदी देवाची द्वारा सादर होत आहे. मंदिरात सकाळी ०६३० वाजता श्रीराम जप (108) तसेच राम रक्षा स्त्रोताचे पठण सुद्धा केल्या जात आहे. भक्तगणांनी आपल्या सहपरिवारासह येऊन कलश पूजेत सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा या समितीद्वारे केल्या गेले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *