प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.काटोल पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक १३७६/२०२३ कलम ४२०,४०९,४०६,१२०(ब) भादवि प्रमाणे दिनांक ३० डिसेबर२०२३ गुन्हा नोंद झाला असून याबद्दल सविस्तर हकीगत पुढील प्रमाणे आहे.यातील फरार आरोपी ताराचंद उमराव वाघमारे व तुषार खडसे दोघेही रा. येनवा ता. काटोल यांनी फिर्यादी लक्ष्मणराव उदापूरकर व पीडित साक्षीदार देवेंद्र आगरकर, देवेंद्र देवरे, निशांत नारनवरे, धनराज गजभिये, सौ. वनिता तागडे सर्व रा. येणंवा ता. काटोल यांना पैसे मिळण्याच्या विविध योजनाचे अमिष दाखवून फसवणूक केली. या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी अंकित सुरेंद्र कुरई, वय २८ वर्षे रा. महाकाली नगर, मोठी उमरी, अकोला ह. मु. (अभिनव चोपडे च्या घरी), नागपूर तसेच अभिनव भगवान चोपडे, वय ३२ वर्ष, रा. डंबाळे- ले-आउट, त्रिमूर्ती नगर, नागपूर यांना विचारपूस केली असता तुषार, अंकित, अभिनव यांनी आरोपीतांचे नावाने १५ वाहने फायनान्स वर खरेदी करून अटकेतील आरोपी यांना परस्पर विक्री केलेत. जेव्हा फिर्यादी तसेच साक्षीदारांचे घरी फायनान्स कंपनीचे रिकवरी एजंट मासिक हप्त्याची मागणी करिता गेले असता त्यांच्यासोबत ताराचंद वाघमारे, तुषार खडसे, अंकित कुरई व अभिनव चोपडा यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने सदर गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.
गुन्ह्याच्या तपासात आरोपी अंकित सुरेंद्र कुरळी तसेच अभिनव चोपडा यांना अटक केली असता सदर वाहने १)शोहेब उर्फ अरमान अहमद सागिर अहमद, वय २६, व्यवसाय :वाहन खरेदी विक्री, रा. जामा मज्जिद येथील हफिस बेकरी जवळ, मोमीनपुरा, नागपूर,२) शेख आसिफ शेख रजब, वय ३१ वर्ष, गायछाप नमक कारखान्या मागे, गांजा खेत चौक, नागपूर ३) साजिद उर्फ संजीव अली रहमान अली, वय ४१ वर्ष,कोठीकर सोसायटी, किरण पेट्रोल पंप जवळ, वणी रोड, यवतमाळ ह. मु. हसनबाग पोलीस चौकी मागे, नागपूर यांना विक्री केल्याचे सांगितल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करून ४ चेतक इ स्कूटर व १ सुझुकी एक्सेस अशी ५ वाहने तपासात जप्त करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी, बापू रोहम तसेच पोलीस निरीक्षक, निशांत मेश्राम यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक, परमेश्वर आर आगासे, नायक, विकास वाहीलकर, शिपाई, प्रमोद ठाकरे, बबन बोंसूले, हिमांशू वंजारी करत आहे.या अनुषंगाने समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्यांच्या सोबत या प्रकारची फसवणूक झाली असेल अशांनी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार करावी.