प्रतिनिधी,प्रविण चव्हाण
नंदुरबार –:शहादा तालुक्यातील सुलवाडे भवानीहट्टी येथे सासूच्या हातावर जावयाने वार करुन दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा तालुक्यातील सुलवाडे भवानीहट्टी येथील रमणबाई आंबालाल सोनवणे यांना जावई राहूल परशुराम मराठे हा दारुच्या नशेत घरासमोर तलवार घेवून शिवीगाळ करीत होता . यावेळी रमणबाई सोनवणे व त्यांचे पती व मुले यांनी राहूल मराठे यास पकडून ठेवत तलवार हिसकावण्याचा प्रयत्न करीत होते .
यावेळी राहूल मराठे याने झटापटी करुन तलवारीने रमणबाई सोनवणे यांच्या हातावर वार करुन दुखापत केली .
तसेच तलवार फेकून पळून गेला . याबाबत रमणबाई सोनवणे यांच्या फिर्यादी वरुन म्हसावद पोलिस मराठे ठाण्यात राहूल याच्याविरोधात भादंवि कलम ३२४ , ५०४ , ५०६ सह भारतीय हत्यार कायदा ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोहेकॉ . जितेंद्र पाडवी करीत आहेत .