नवापूर नदी पात्रात मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ.

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी

प्रविण चव्हाण,नंदुरबार -:शहरातील जुनी पोष्ट गल्लीच्या मागील बाजूस भाजीपाला बाजाराच्या जवळ रंगावली नदी पात्रात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे .

पुरुष जातीचा मृतदेह रंगावली नदी पात्रात मध्यभागी तरंगताना लोकांच्या लक्षात आल्याने ही बाब उघडकीस आली आहे ही माहिती वार्यासारखी गावात पसरल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली होती . नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ , पोहेका गणेश बाच्छाव , युवराज परदेशी आणि त्यांची टीम घटना स्थळी दाखल झाले असून मृतदेह फुगलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटलेली नाही सदर पुरुषाच्या अंगात शर्ट नसून वाघपट्ट्या वाल्या काळ्या रंगाची पेंट घातलेली आहे . मृतदेह दोन तीन दिवसांचा असल्याचा अंदाज आहे फुगलेल्या मृतदेहाच्या अगदी हाके च्या अंतरावर कपडे भरलेली थैली आढळून आली आहे .

यावेळी शहरातील पत्रकार जनक दलाल , यांनी नदी पात्राच्या मधोमध असलेला मृतदेह किनाऱ्या पर्यन्त आणला नंतर सामाजिक कार्यकर्ते आबा मोरे , जाकीर शेख आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याने मदत करत कापडी झोळी मध्ये टाकून नदीपत्रातून करंजी ओवारा पुला वर आणून मृतदेह टेम्पो च्या साह्याने उपजिल्हारुग्णालयात शवविच्छेदना साठी आणण्यात आले . नवापूर शहरातील रंगावली नदी पात्रात सकाळी 7 वाजता मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली होती . सदर शासकीय मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदना साठी आंनण्यात आला होता तेथे प्रत्यक्ष दर्शी ने बघितल्या नंतर त्याचीओळख पटली असून माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिहाडे यांच्या निवासस्थाना जवळ बेलदार वाड्यात राहत होता . मयताचे मृत्यू चे कारण समजू शकलेले नाही मयत युवकाचे नाव सुनील देवा नाईक आहे त्याचे आई वडील अनेक वर्षा पूर्वी मयत झाले होते . तो घरात एकटाच राहत असल्याचं माहिती मिळाली असून गावातील नातेवाईका कडून मृतदेह ताब्यात घेण्याची कारवाई सूरु आहे . माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिहाडे यांच्या सहकार्याने व मयत सुनील नाईक च्या मित्रा कडून अंत्यसंस्कार ची तयारी करण्यात येत आहे .

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *