उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान
नागपूर, दि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभानंतर विविध पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यात भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा, यशस्वी लघुउद्योग जिल्हा पुरस्कार, महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाचे जिल्हास्तरीय विजेता, उत्कृष्ट पोलीस पथक, पोलीस आयुक्तालयाच्या वतीने देण्यात येणारी पोलीस पदकांचे वितरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
*भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३*
अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३ चे वितरण करण्यात आले. यात प्रथम पुरस्कार खेडी, गोवारगोंदी, ता. नरखेड या ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला. खुर्सापार, ता.काटोल यांना द्वितीय तर डोली, भांडवलकर ता. काटोल ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
*यशस्वी लघु उद्योग जिल्हा पुरस्कार २०२२*
यशस्वी लघुउद्योग जिल्हा पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. यात मे. शुभलक्ष्मी फुड इंडस्ट्रीज प्रो. अंकित अग्रवाल, लिहिगांव ता.कामठी यांना प्रथम, मे. ब्रामनी इंडस्ट्रीज प्रो. हरीश पुरुषोत्तम शर्मा बुटीबोरी परिसर, नागपूर यांना द्वितीय तर मे. डॅफोडिल इंन्गीव्हिन्स इंडिया पा. लि. प्रो. रेखा प्रमोद अग्रवाल बुटीबोरी परिसर, नागपूर यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. गौरव चिन्ह प्रमाणपत्र व रोख पंधरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
*महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेज उपक्रम*
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेज उपक्रमाचे जिल्हास्तरीय पुरस्कारांचे क्रिष्णा किर्तीकुमार सेदानी, प्रथमेश कारंजेकर, प्रणय छगन डोबळे, उदय सिंग ठाकुर, प्रथमेश नंदकिशोर कुईटे, सौम्या सुनिल यादव, तान्या सत्तुजा, अवंती पुसदेकर, डॉ. कोमल रविद्र देवतळे, प्रतिक मेश्राम यांना प्रदान करण्यात आला.एक लक्ष भांडवल या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे.
*उत्कृष्ट पोलीस पथके व विद्यार्थी पुरस्कार*
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पथसंचलनात सहभागी पथकांपैकी तिघांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. पोलीस पथकामध्ये पहिल्या क्रमांकाने नागपूर शहर महिला पोलीस यांना द्वितीय नागपूर शहर पोलीस तर तृतीय क्रमांक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४ यांना सन्मानित करण्यात आले. तर विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक प्रहार डिफेन्स अकॅडमी प्रहार डिफेन्स अकॅडमी खामला, द्वितीय क्रमांक वर्धमान सैनिकी शाळा वडधामना तर तृतीय क्रमांक प्रहार सैनिकी शाळा रवी नगर यांच्या पथकांना सन्मानित करण्यात आले.
*जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान*
निवडणूक सुधारणासंदर्भात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते भारत निवडणूक आयोगाचा ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ‘ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. इटनकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल पोलीस अधिकारी संजय पाटील यांना सन्मानितकरण्यात आले.