Thursday, July 25, 2024

फायनान्स कंपन्यांच्या गळफास मुळे ग्रामीण व शहरी, भागातील.गृहिणी संकटात.!

मन्सूर शहा दै खोज मास्टर (चिखली):–फायनान्स कंपन्यांच्या गळफास मुळे गृहिणी संकटात.कर्जापायी अवलंबतात अनैतिक मार्ग.कोणताही गृहउद्योग, छोटा व्यवसाय नसतांना भरमसाठ व्याज मिळविण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्या महिलांना कर्ज देतात व कर्जाची वसुली दादागिरी करून वसुली करतात अपमान व समाजलज्जेपायी महिला निवडतात अनैतिक मार्ग.खरं तर महिलांचा सन्मान ही आपली संस्कृती जिथं महिलांचा अपमानजनक विषय येतो तिथं बोलणं टाळल्या जातं. प्रबोधन ज्यांचा पिंड ते निसंकोच लिहतात बोलतात.फायनान्स कंपन्या कडून कर्ज घेतलेल्या महीलांविषयी काही खबऱ्या कडून मिळालेली माहिती खूप धक्का दायक आहे. माझ्या संपर्कातील आपण सुज्ञ नागरिक , शासकीय कर्मचारी, अधिकारी आहात नक्कीच आपण हा लेख वाचल्यावर फायनान्स कंपन्या कडून महिलांची होणारी मुस्कटदाबी वर विचारमंथन करून त्यांना फायनान्स कंपन्या च्या पाशातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न कराल .चिखली हे आमचे सुसंस्कृत, संपन्न असे शहर.काही अपवादात्मक घटना सोडल्या तर शहरात सर्वच जाती धर्माचे नागरीक गुण्यागोविंदाने राहतात.विषय चिखली शहराचा असला तरी या फायनान्स कंपन्याचे जाळे देशभरात पसरले आहे.ग्रामीण भागातील लोकांचा शहराकडे वाढता कल पाहता शहराची वाढ पण झपाट्याने होत आहे.विज्ञानाने वेगवेगळी आविष्कार केल्याने सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे आपल्याला जगाची माहिती तर मिळतेच सोबत पाश्चिमात्य फैशन चे लोन दुर्त वेगाने महानगर, शहर ते छोट्या मोठ्या गाव खेड्या पर्यंत पोहचले. वेगवेगळया प्रसिद्धी माध्यमांच्या साहाय्याने आपली व्यवसायिक वस्तुंची माहिती घराघरापर्यंत पोहचविण्यासाठीतंत्रज्ञानाचा खूप मोठा सहभाग आहे. जगात कुठेतरी हजारों किलोमिटर दूर असलेल्या पिझा, बर्गर, चोकलेट, सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तूच नव्हे टॉयलेट क्लिनर पासून विलासी आयुष्य जगण्यासाठी एसी, टिव्ही, फॅन, कुलर, मिक्सर, वॉशिंग मशिन, टू व्हीलर, फोर व्हिलर वाहने अशी अनेक व्यवसायिक निर्माण हे आपल्या घरीच मोबाइल वर टीव्ही वर दिसत असतात. टेक्नालॉजी चा वापर करून मल्टी नॅशनल कंपन्यांनी घरो घरी आपले प्रोजेक्ट पोहचविले.सोबतच प्रत्येक शहरात आपल्या अधीकृत डीलर द्वारे उपलब्ध करून दिले. टेक्नोलॉजी ने पुढचे पाऊल घेत आता वेगवेगळ्या डिलिवरी कंपन्या हे ऑनलाईन ऑर्डर घेऊन खाद्य वस्तू पासून जगाच्या पाठीवर मिळणारी प्रत्येक वस्तू घरपोच आणून देत आहे. ज्वेलरी, साड्या, घर संसारात आवश्यक वस्तूंच्या जाहिराती ह्या महिलांना आकर्षित करतात त्या वस्तू बाजारात उपलब्ध असल्याने खरेदी करण्याची ईच्छा सहाजिकच होते.अश्या काही मुलभूत व काही अनावश्यक हौसेपोटी खरेदी करण्यासाठी महिलांना पैश्याची चणचण भासत असल्याने ती वेळेवर पूर्ण करण्यासाठी फायनान्स कंपन्याच्या जाळ्यात अडकतात.कोणतीही फायनान्स कंपनी असो त्यांना कर्ज देण्यासाठी काही शर्ती अटी असतात.कर्ज देतांना कर्जधराकाचा उद्देश समोर ठेऊन कर्ज दिल्या जाते.त्याचा व्यवसाय, त्याचे सिबिल, त्याची आमदनी पाहून कर्ज मंजूर केल्या जाते.कर्जाचे व्यवसायिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज व तारण कर्ज अशी महत्वाचे चार प्रकार असतात.गृह कर्ज, वाहन कर्ज हे ग्राहकाची ऐपत व फेडण्याची क्षमता पाहून त्या वस्तूच्या सत्तर ते ऐंशी टक्के मध्ये कर्ज दिल्या जाते.तारण कर्ज यात ग्राहकाकडून चल अचल संपत्ती, सोने व ईतर मौल्यवान वस्तू ठेवून कर्ज दिल्या जाते यात ग्राहकाचा कर्ज फेडण्याची वा त्याच्या उद्देशाची बँकेला किंवा फायनान्स कंपनीला देणं घेणं नसतं.चौथा प्रकार व्यवसायिक कर्ज या प्रकारात कर्ज देतांना सर्वाधिकार बँक व फायनान्स कंपन्यांना असतात कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकांचे सिबील, त्याचा व्यवसाय त्याची रोजची किंवा वार्षिक आमदनी करीत असलेल्या व्यवसायाचे ठिकाण अश्या अनेक बाबी तपासून कर्ज दिल्या जाते.महिला सक्षमीकरण व महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठीं स्वतंत्र व्यवसाय किंवा गट बनवून गृहउद्योग किँवा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका यांना दिलेल्या टार्गेट नुसार बचत गटांना कर्ज वितरित करावे लागते. महिलांना कर्ज देतांना बँका त्यांच्या व्यवसायाची व उद्देशाची शहानिशा करून कर्ज देतात त्यामुळे कर्जाच्या रूपात घेतलेली रक्कम योग्य ठिकाणी वापरात येते व महिलांना स्वतःच्या सक्षमीकरणाची वाट मोकळी होते.ज्या महिलांना फक्त आपल्या आर्थिक अडचणी दूर करायच्या आसतात ज्यांना घरगुती वस्तू, स्वतःचे खर्च पूर्ण करायचे असतात अश्या महिलांना बँकेकडे कर्ज मिळत नसल्याने या महीला फायनान्स कंपन्या कडे वळतात.अश्या गरजू महिलांना शोधण्यासाठी फायनान्स कंपन्यांनी अनधिकृत पणे एजेंट ची निवड केलेली असते ज्यांना प्रत्येक गटाच्या कर्ज वितरण वर ठराविक रक्कम कमिशन म्हणुन दिल्या जाते.बँकांच्या विपरित फायनान्स कंपन्याचे लूटमारीचे धंदे थोडे वेगळेच आहेतशहरातील किंवा खेड्या पाड्यातील चार किंवा दहा महिलांचा गट बनवून त्यांना कोणताही व्यवसाय नसतांना कर्ज पुरवठा करतात ज्या महिलांना इन्कम सोर्स किंवा घरातील कर्त्या पुरुषांची मदत होत नसेल अश्या महिलांना कर्ज फेडण्यासाठी खूप कसरत करावी लागते.हप्त्याच्या दिवशी फायनान्स कंपन्याचे एजेंट हे वसुली साठी घरी येऊन बसतात अश्यावेळी.जो पर्यंत पैसे मिळत नाही ती पर्यंत घराच्या उंबऱ्यावर ठान मांडून बसतात.व उग्रट भाषेत पैश्याचा तगादा लावतात वेळ प्रसंगी पोलीस कारवाईची धमकी पण देतात हा सगळा खेळ चार भिंतीच्या आत होत नसतो बाहेर गल्लीत चाललेला हा प्रकार शेजारी पाजारी पाहतात हे फायनान्स कंपन्याचे एजेंट गल्लीत महिलांची नाचक्की करण्यात कोणतीच कसर सोडत नाही.आपला होणारा अपमान व समाजात आपली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून आठवडाभर हप्त्याचे पैसे जमा करण्यासाठी महिलांना वेग वेगळे मार्ग अवलंबवावे लागतात.फायनान्स कंपन्या महिलांना कर्ज उद्योग धंद्यासाठी महिला सक्षमीकरण साठी देतात का त्यांना कायम कर्जबाजारी करून वाईट मार्गाने जाण्यासाठी देतात हा प्रश्न अनुत्तरित आहे.

,#अपवाद…काही महिला छोटे कर्ज घेऊन गृह उद्योग करतात छोटी मोठी गुंतवणूक करून त्यातून मिळालेल्या आमदनीत आपला संसार चालविण्यासाठी हातभार लावतात त्यासाठी त्यांचे पती, कमावती मुले पण वेळ प्रसंगी मदत करतात अश्या महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी समूह कर्ज योजना रोजगार ची सुवर्ण संधी समजावी.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang