मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा    

शेतमालावर १टक्का बटाव घेणा-या व्यापाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या चिखली येथील मनसे पदाधिकाऱ्यांवर खोटे खंडणीचे गून्हे दाखल करण्यात आले असून हे गून्हे तात्काळ मागे घेणा-या साठी देऊळगाव राजा  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय पोलिस कार्यालय देऊळगाव राजा यांना निवेदन देण्यात आले,.                           चिखली येथील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत तिरुपती जिनिंगचे गोविंद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांकडून घेण्यात येणा-या एक टक्का बटाव ही आमची कमाई आहे असे म्हणत जाब विचारण्यासाठी गेलेले मनसे पदाधिकारी राजेश परिहार, नारायण बापू देशमुख,प्रदीप भवर, यांच्या अंगावर परप्रांतीय कामगार पाठवून मारहाण केली तसेच खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले तरी खंडणी चे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे,व शेतकऱ्यांची लूट मार करीत असलेल्या बेकायदेशीर खाजगी अडत व्यापार्यावर तात्काळ गून्हे दाखल करण्यात यावे शेतक-यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला ,.                  निवेदन ते समयी मनसे शहर अध्यक्ष बंडू राजे डोळस, शहर उपाध्यक्ष नवनाथ रामाणे,सचिन विधाते,आकाश डोळस, जेष्ठ नेते सहजाद भाई,श्रावण वायाळ,हर्षद हरकळ, गौरव वल्टे, अजय पवार, अशोक खरात, सचिन खरात,शरद खरात,देवा चव्हाण, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *