वाशिम येथे वैशाखी पौर्णिमा व २५८७ वी बुध्द जयंती उत्साहात साजरी.

Khozmaster
1 Min Read
वाशिम: स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे तथागत गौतम बुद्ध यांची २५८७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
            यावेळी बुद्ध जयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुद्ध जयंती सार्वजनिक उत्सव समिती अध्यक्ष विनोद पट्टेबहादूर होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून गोपाळराव आटोटे गुरूजी, रामप्रभू सोनोने, वसंतराव इंगोले, प्रतिभाताई सोनोने, दौलतराव हिवराळे, संगीताताई इंगोले, बबनराव खिल्लारे, सोनाजी इंगळे, शेषराव धांडे, अरूणा ताजणे, हेमंत तायडे, सुनिल कांबळे,राजकुमार पडघान, माधव डोंगरदिवे, प्रविण पट्टेबहादूर, डॉ.संजय पडघान, गोवर्धन राऊत, सुनिल खाडे, संगीता पडघान, अशोक अंभोरे, अशोक खिराडे, अरविंद पडघन, प्रदिप पट्टेबहादूर, संदिप कांबळे, दिपक पट्टेबहादूर ,देवकाबाई खडसे, प्रमिला कांबळे,खाडे ताई, अंभोरे ताई, दादाराव इंगोले अदिसह अनेकांची उपस्थिती होती.
सर्व प्रथम मैदानामधील तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्प अर्पण केले.
 नंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण रामप्रभू सोनोने, वसंतराव इंगोले व विनोद पट्टेबहादूर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आणि याचवेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले.
           यावेळी माधव डोंगरदिवे यांनी उपस्थितांना सामुदायिक त्रीशरण पंचशील दिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजकुमार पडघान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण पट्टेबहादूर यांनी मानले.कार्यक्रमाला शहरातील बौद्ध उपासक, उपासिका यांची बहूसंख्येने उपस्थिती होती.
0 9 3 7 0 7
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *