२८ मे जागतीक मासिक पाळी दिनानिमित्त १००० सॅनिटरी नॅपकिन पॅडचे किशोरवयीन मुली व महिलांना वाटप

Khozmaster
4 Min Read
“फुले शाहू आंबेडकर ब्लड डोनर व रूग्ण सेवा ग्रुप आणि राजा प्रसेनजीत संस्था यांचे आयोजन”
युवा सामजिक कार्यकर्ते प्रदीप पट्टेबहादूर,अतुल राऊत यांची माहिती
वाशिम  प्रतिनिधी ;  28 मे हा जागतिक मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो.त्याच अनुषंगाने तरूण युवक आणि युवती यांनी एक पुढाकार घेऊन एक अभिनय पुर्ण सामाजिक  उपक्रम राबवत २८ मे मासिक पाळी दिनानिमित्त  १००० सॅनिटरी नॅपकिन पॅड चे वाटप करण्यात येणार असून असी माहिती युवा सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त( महाराष्ट्र शासन) प्रदिप पट्टेबहादूर ,अतूल राऊत, माविम CRP शारदा तेलगोटे,सामाजिक कार्यकर्त्या वैष्णवी शर्मा, ग्राम सदस्या कोंडाळा मा आम्रपाली आघम, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका आकांक्षा गायकवाड, यांनी दिली आहे.
 दरवर्षी २८ मे रोजी ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ (Menstrual Hygiene Day 2024) साजरा केला जातो. मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला मासिक पाळीला सामोरे जावे लागते. ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ हा दिवस महिला/मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.
जिल्ह्यातील विविध भागातील किशोरवयीन मुली/महिला तसेच पाड्यावरील पाल ठोकून राहणाऱ्या महिला ,आदिवासी समूह,पारधी,गरीब व गरजू अशा महिला भगिनींना वाटप केले जाणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, मासिक पाळीबद्दलचं मौन तोडून या काळात चांगली स्वच्छता ठेवली गेली तर महिला आणि मुलींचं किती मोठ्या प्रमाणावर सबलीकरण होईल याचा प्रचार करण्यासाठी, त्याची आठवण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. त्यासाठी मासिक पाळीवर काम करणाऱ्या सगळ्या संस्था, सरकारं, खासगी कंपन्या, प्रसारमाध्यमे आणि व्यक्तींनी एकत्र यावे हा या मागचा हेतू आहे.
ज्या मुलीची मासिक पाळी येऊ घातली आहे. अशा मुलीला सर्व कुटुंबीय म्हणून पाठिंबा देणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलीची आई, बहीण सोबतच वडील ,भाऊ सर्वांनी मिळून तिला मासिक पाळीविषयी जागृत करायला हवे. जेणेकरून तिचा आत्मविश्वास वाढेल. तिला हिंमत येईल की माझे वडील, माझा भाऊ माझ्यासोबत आहे. त्यामुळे मासिक पाळी हा पुरुष वर्गापासून किंवा समाजापासून लपवण्यासारखा विषय नक्कीच नाही. तिला हा विश्वास असावा की मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मला माझ्या कुटुंबातील वडील, भाऊ, नवरा, मुलगा यापैकी कुणीही सहजरित्या पॅड देऊ शकतात. म्हणजे त्या मुलीला किंवा पाळी आलेल्या बाईला मासिक पाळीच्या काळात तितकचं मानसिक समाधान मिळतं की माझं सर्व कुटुंबीय माझ्यासोबत आहे. आणि मासिक पाळी हा लपवण्याचा विषय नसून मुक्तपणे बोलण्याचा विषय आहे. सर्वांगी मत फुले शाहू आंबेडकर ब्लड डोनर व रुग्णसेवा ग्रुप महाराष्ट्र राज्य वाशिम जिल्हा संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त (महाराष्ट्र शासन) प्रदिप पट्टेबहादूर , अतुल राऊत,राजा प्रसेननजीत अल्पसंख्यांक शिक्षणा बहुउद्देशीय संस्था प्रतिनिधी वैष्णवी शर्मा, ग्रा.प कोंडाळा सदस्य आम्रपाली आघम,राष्ट्रीय सेवा योजना व युनिसेफ व नेंयुकें स्वयंसेविका आकांक्षा गायकवाड, निकिता पट्टेबहादुर, सारिका गायकवाड यांनी केले आहे. या उपक्रमासाठी आर्थिक स्वरूपाची मदत देखील हवी आहे आपल्या सोयीच्छेने आपण आपल्या आई-बहीण,ताई यासाठी जी काही मदत आपल्या परीने आपण करत असाल तर या फोन पे – गुगल पे 7447212475 नंबर वरती आणि बँक खाते क्रमांक ;  3341393728 आय.एफ.सी कोड ; सी. बि .आय. एन.ओ 282888 ( सेंट्रल बँक ऑफ इंडिया) या खात्यावरती टाकून सहकार्य करावे.
*”मासिक पाळी म्हणजे विटाळ नसून निसर्गाची देणगी आहे. ही समजून घेऊया आणि पाळी बद्दलच्या अंधश्रद्धा दूर करूया”*
0 9 3 7 0 6
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *