जिल्हा प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर
वाशीम:- येथून जवळच असलेल्या अडोळी येथील जि.प.प्राथ.केंद्रीय शाळेत समग्र शिक्षा अंतर्गत इको क्लब ही योजना असून या योजनेच्या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयी संवेदनशीलता विकसित करणे, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता, वृक्षारोपण इत्यादी उपक्रम राबविण्यात यावे म्हणून शासनाने शाळेमार्फत उपक्रम राबविण्यात यावे.म्हणून शाळांना आदेशित केले.म्हणून एका
आदेशानुसार जि.प.प्राथ.शाळेत वर्ग पहीली ते सातवी च्या विद्यार्थ्यांचे सात दिवसांचे उन्हाळी शिबिर दि.५ जून जागतिक पर्यावरण दिनापासून सुरूवात करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले.नंतर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटना अध्यक्ष राजकुमार पडघान होते.राजकुमार पडघान यांच्या हस्ते व शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करून उन्हाळी शिबिरांचे उद्घाटन केले.
यावेळी मुख्याध्यापक भागवत मोहीरे, शिक्षक विश्वनाथ इढोळे, कांचन हरणे,डींगाबर शिंदे, राजू इढोळे, गणेश जाधव, गजानन इढोळे, भगवान शिंदे यांची उपस्थिती होती.
नंतर कार्यक्रमाचे उद्घाटक राजकुमार पडघान यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात पर्यावरण, वातावरणानुसार वृक्षलागवड, स्वच्छता,पाण्याची बचत, आरोग्य , आणि ऊर्जा याविषयी सविस्तर अशी माहिती सांगितली. यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी एकूण समग्र शिक्षा इको क्लब अंतर्गत घेण्यात येत असलेल्या सात दिवशीय उन्हाळी शिबिरांचे नियोजन सांगून होणाऱ्या सातही दिवशी शिबिरासाठी शिक्षक विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. यावेळी राजू इढोळे,व कांचन हरणे यांनीही विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण दिनाविषयी माहीती सांगितली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन इढोळे यांनी मानले.कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
Users Today : 22