इस्रायल-हमास युद्धा सुरू असतानाच, आता हिजबुल्लाहनेही इस्रायलची झोप उडवली आहे. हिजबुल्लाहने गुरुवारी इस्रायलच्या अनेक लष्करी तळांवर रॉकेट हल्ले केले. यामुळे आता मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाची भीती वर्तवली जात आहे.
आपण इस्रायलच्या अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि रॉकेट हल्ले केल्याचे हिजबुल्लाहने स्वतःच म्हटले आहे. हिजबुल्लाह हे ईरानशी संबंधित एक सैन्य संगटन आहे.
हिजबुल्लाहने यापूर्वी बुधवारीही इस्रायलवर 200 रॉकेट डागले होते. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाहने गुरुवारी इस्रायलवर १५० हुन अधिक मोठे रॉकेट आणि ३० डोन हल्ले केले. त्यांच्या रॉकेट आणि ड्रोनने इस्रायली सेन्याच्या 9 ठिकानांना आणि निशाणा बनवले. या हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. हिजबुल्लाहने बुधवारीही इस्रायलवर 250 रॉकेट डागले होते.
मारा गया था शीर्ष कमांडर –
तत्पूर्वी, मंगळवारी इस्रायलच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर अबू तालेब मारला गेला होता. याच्या प्रत्युत्तरात हिजबुल्लाहने हा हल्ला केला. हा हल्ला बदला घेण्यासाठी करण्यात आला, असे हिजबुल्लाहनेही म्हटले आहे.
अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार, हिजबुल्लाहने गोलन हाइट्ससह 15 इस्रायली ठिकानांना निशाणा बनवण्यासाठी 150 रॉकेट आणि 30 स्फोटक ड्रोनचा वापर केला. याशिवाय, इस्रायली मेडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्लात किमान २ लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर, इस्रायली सेनिकांनीही अनेक ड्रोन आणि रॉकेट नष्ट केले. काहींचे ब्लास्ट झाल्याने आगीच्या घटना घडल्या. इस्रायली सैन्याने ‘एक्स’वर यासंदर्भात माहिती दिली आहे.