भरधाव चारचाकीच्या धडकेत पोलीस पाटील ठार; गुजरातमधील आरोपींनी काढला घटनास्थळावरुन पळ

Khozmaster
1 Min Read

लकापूर: भरघाव चारचाकीच्या जबर धडकेत डोक्यात गंभीर मार बसल्याने तालुक्यातील मौजे कुंड बु. येथील पोलिसपाटील जागीच ठार झाले. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हाॅटेल यादगारनजीक सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

अपघातानंतर गुजरातमधील चारचाकीने पोबारा केल्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

तालुक्यातील कुंड बु. येथील रहिवासी तथा पोलिसपाटील नामदेव तुकाराम कवळे (५८) हे नेहमीप्रमाणे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले. सकाळी ९:४५ मिनिटांनी त्यांनी कुंड बु. फाट्यावरून महामार्ग ओलांडला. त्यानंतर हाॅटेल यादगारनजीक वाहन पकडण्यासाठी ते चालत होते. त्यावेळी ९:५२ मिनिटांनी मुंबईवरून नागपूरकडे जाणारी चारचाकी (जीजे-१५, बिएफ-२५६४) भरधाव येत कवळे यांना उडविले. या घटनेतील धडक एवढी भीषण होती की, ते अक्षरशः फुटबॉलसारखे हवेत उडून खाली कोसळले. डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात घडल्यानंतर त्या चारचाकीतून लोक खाली उतरले. त्यांनी कवळे यांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेत पाहिले, पण घटनास्थळी न थांबता त्यांनी पुन्हा गाडीत बसून पोबारा केला. माणुसकी हीन कृती महामार्ग व्यवस्थापनाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आजूबाजूच्या असंख्य लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. काहींनी त्यांना तपासले असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. जमलेल्या लोकांनी तत्काळ त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला.

0 6 3 9 0 6
Users Today : 199
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *