निरोगी राहण्यासाठी बरेच लोक मोड आलेले वेगवेगळे कडधान्य खातात. अनेक लोक आपल्या दिवसाची सुरूवात हे मोड आलेले कच्चे कडधान्य खाऊन करतात. या कडधान्यांचे शरीरात अनेक फायदेही मिळतात.
पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, पावसाळ्यात मोड आलेले कडधान्य खावे की नाही? खासकरून मोड आलेले चणे किंवा मूग पावसाळ्यात खावेत की नाही? तर यावर नाही असं उत्तर एक्सपर्ट देतात. पण सोबतच तुम्हाला मोड आलेले कडधान्य या दिवसात खायचेच असतील तर कसे खावेत याचाही सल्ला देतात.
पावसाळ्यात वातावरण बदलामुळे, हवेतील ओल्याव्यामुळे, उन्ह कमी पडत असल्याने शरीरावर याचा प्रभाव पडतो. पावसाळ्यात आपली पचनक्रिया खूप कमजोर होते. ज्यामुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या जसे की, अपचन, गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे, डायरिया इत्यादी. त्यामुळे या दिवसात कच्च्या भाज्या खाणं टाळण्याचा सल्ला दिला. हेच मोड आलेल्या कडधान्याबाबत सांगता येईल. न्यूट्रिशनिस्ट व डायटिशिअन गरीमा यांनी त्यांच्या इन्स्टा व्हिडीओत मोड आलेले कडधान्य कसे खावे याबाबत सल्ला दिला आहे.