Friday, September 13, 2024

जय गणेश! गणपती बसवा अन् पाच लाखांचा पुरस्कार मिळवा!

त्रपती संभाजीनगर : श्रावणाला सुरुवात होताच सर्वांना लाडक्या बाप्पांच्या आगमनाचेही वेध लागले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आता तयारीला लागले आहेत. त्यांचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी यंदा शासनाच्या पु.

ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, राज्यातील प्रथम विजेत्या गणेश मंडळाला ५ लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

कोणते सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी होऊ शकते
नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे.

निकष काय असणार
१) सार्वजनिक गणेश मंडळाकडून सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन.
२) संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी राबविण्यात आलेले उपक्रम.
३) गडकिल्ले, राष्ट्रीय व राज्य स्मारके यांचे जतन व संवर्धन.
४) धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, जतन व संवर्धन.
५) विविध सामाजिक उपक्रम व कार्य.
६) पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट.
७) ध्वनिप्रदूषणरहित वातावरण.

निकषांच्या आधारे परीक्षण
गणेशभक्तांसाठी केलेल्या सोयी-सुविधांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि तसेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक राबवले जावेत, म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जाणार आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे.

असे मिळतील पुरस्कार
राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळास ५ लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाला २ लाख ५० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला १ लाख रुपयांचे पारितोषक व प्रमाणपत्र, जिल्हास्तरावर प्रथम विजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख कधी
राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर पाठवावा.

कोण करणार परीक्षण
गणेशोत्सवाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून होत आहे. यानिमित्त आयोजित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या परीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक जिल्हास्तरीय समिती गठित केली जाईल. ही समिती जिल्ह्यातील मंडळांना भेट देऊन त्यांचे परीक्षण करेल.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang