दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद – नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या

Khozmaster
1 Min Read

त्रपती संभाजीनगर : दसरा, दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे सिकंदराबाद – नगरसोल – सिकंदराबाद विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.सिकंदराबाद -नगरसोल विशेष रेल्वे सिकंदराबाद येथून ९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान दर बुधवारी सायंकाळी ५ वाजता सुटेल. लिंगमपल्ली, शंकरपल्ली, विकाराबाद, जाहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, जालना, छत्रपती संभाजीनगर, रोटेगावमार्गे नगरसोल येथे गुरुवारी सकाळी ८ वाजता पोहोचेल. तर नगरसोल ते सिकंदराबाद विशेष रेल्वे नगरसोल येथून १० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी रात्री १० वाजता सुटेल आणि सिकंदराबाद येथे शुक्रवारी सकाळी १०:५० वाजता पोहोचेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *