शिरूर तालुक्यातील शिव पाणंद शेतरस्ते खुले न केल्यास तहसीलवर तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करणार- शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)
शिरूर तालुका प्रतिनिधी:- फैजल पठाण
शेवटच्या शेतकऱ्याला शेतीला दर्जेदार रस्ता मिळाल्याशिवाय थांबणार नाही- शरद पवळे
शिरूर तालुक्यातील विविध गावच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता कृती समितीच्या समोर शेतरस्त्यांचा वर्षानुवर्षांचा प्रशासकीय पातळीवरील संघर्षांच्या व्यथा मांडल्या यासंदर्भात शेतकऱ्यांच्या पाठीशी समिती भक्कमपणे उभे राहत तातडीचे विविध मांगण्यांचे निवेदन शिरूर तहसिलदारांसह, गटविकास अधिकाऱ्यांना देवुन दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारू -असे यावेळी शरद पवळे म्हणाले,
शिरुरच्या शासकीय विश्रामगृहावर शिव पानंद शेतरस्ता समितीच्या वतीने मार्गदर्शन मेळावा बैठकीत तालुक्यातील विविध गावच्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहून शेतरस्त्यासंदर्भातील आपल्या समस्या मांडल्या विविध प्रश्नांच्या चर्चासत्रानंतर सर्वानुमते शिरूर शिव पानंद शेतरस्ता कृती स्थापन करत तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस तातडीने निकाली काढा,शासन निर्णयाची अंमलबजावणी करवी, तालुका शेतरस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समितीच्या तातडीने आदेश देण्यात यावेत, तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात,शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी,शिव पानंद शेतरस्त्यांचे सर्वेक्षण करून नंबरी हटवणार यांना दंड सुरू करा,तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा,शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावासाठी दर्जेदार शेतरस्ते करावेत,शेतरस्त्याअभावी पडीक राहणाऱ्या शेत जमीन धारकांना विना अट नुकसान भरपाई देण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन शिरूर तहसीलदारांसह गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले .
यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे शरद पवळे यांसह रवींद्र सानप,रवींद्र धनक,ॲड. सुप्रिया साकोरे ,शांताराम पानमंद,निलेश गायकवाड,सुनिता चव्हाण,संजय कुशेकर,नितीन थोरात,संतोष लंघे,लक्ष्मण मनाजी वाळके,शिवाजी कोहकडे ,प्रकाश वाखारे,नवनाथ गायकवाड, फिरोज सय्यद, बापू पाचरणे,विकास आटोळे,नाना सरोदे अजिज खान, इस्माईल खान, दळवी मेजर, मच्छिंद्र गायकवाड, अशोक शेळके तसेच पत्रकार फैजल पठाण ,रवींद्र खुडे , मुकुंद ढोबळे, सुदर्शन दरेकर उपस्थित होते.