जळगाव : यावल तालुक्यातील फैजपूर परिसरातील एका आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क ट्रॅक्टर मधून प्रवास करून घरी आणण्यात आले हा सर्व प्रकार एका व्हिडिओमध्ये दिसत असून हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्य शासन आश्रम शाळेतील सुविधांसाठी पाण्यासारखा पैशांचा वापर करत असते. मात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव अनेकदा आश्रमशाळेतील संचालक टांगणीला लावला जात आहे. आश्रम शाळा म्हटली म्हणजे राज्य शासन पुरस्कृत म्हटले जाते. आश्रम शाळेत संपूर्ण विद्यार्थ्यांचा खर्च हा राज्य शासन पुरवत असते. यात जेवणापासून त्यांच्या कपड्यापासून सर्व सुविधा पुरवल्या जातात. मात्र वारंवार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनात निकृष्ट जेवण तसेच कपड्यांमध्ये कमतरता तसेच शालेय वस्तूंमध्ये केलेला भ्रष्टाचार हे उदाहरण आपण अनेकदा बघितलेली आहे.मात्र फैजपूरमध्ये चक्क आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॅक्टर मध्ये बसवून जीवघेणा प्रवास करण्यास भाग पाडले. जर एखादा विद्यार्थी याच ट्रॅक्टर मधून पडला असता तर मोठी जीवितहानी झाली असती, या शैक्षणिक संस्था चालकावर शिक्षण विभाग काय कारवाई करणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लहान मुलांची वाहतूक ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात असल्याचे दिसत आहे. तसेच या शाळेतील लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न काही दिवसांपूर्वीच उपस्थित झाले होते. यामुळे शाळेतील सुरक्षितता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आणि शिक्षणाची गुणवत्ता यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून यावर तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.फैजपूर शहर म्हटलं की ऐतिहासिक शहर म्हणून या पैशाची ओळख निर्माण होते. खरं तर विद्यार्थ्यांना आश्रम शाळेतून घरी आणण्यासाठी खाजगी वाहन किंवा शाळेचे अधिकृत वाहन असणे गरजेचे आहे. मात्र हा प्रकार भयंकर निंदनीय आहे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी चक्क ट्रॅक्टर मधून प्रवास करावा लागत आहे. आश्रम शाळा ते या ठिकाणाचे अंतर जवळपास सहा किलोमीटरचा प्रवास होता आणि याच सहा किलोमीटरच्या प्रवासामध्ये एखादा विद्यार्थी जर ट्रॅक्टर मधून बाहेर पडला गेला असता तर मोठी जीवितहानी या ठिकाणी झाली असती. नेमकी ही शाळा कोणाची आहे याचा तपास शिक्षण विभागाने करून संबंधित शिक्षण संस्था चालक यांची चौकशी करून त्यांच्यावर ती कारवाई करण्यात यावी व संबंधित आश्रम शाळेची मान्यता देखील रद्द करण्यात यावी अशी देखील मागणी या सोशल मीडियाच्या माध्यामातून होत आहे.