पुणे : पुण्यातील अभियंत्यावर ३० ते ४० जणांच्या टोळक्याकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुळशी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. इंजिनिअर तरुणाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ४० जणांनी काठी, रॉड, दगडांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पौड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुसगाव येथे राहणाऱ्या रवी करणानी या अभियंत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. हा प्रकार २९ सप्टेंबर रोजीचा लवळे गाव ते नांदे गाव दरम्यान घडला असल्याचे व्हिडीओमधून समोर आलं आहे.
रवी करणानी यांच्या पोस्टमध्ये काय?
रवी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “रस्त्यावरील वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ४० जण लोखंडी रॉड, दगड आणि काठ्या घेऊन आमच्या गाडीवर हल्ला करत होते. दोन बाईकवरुन काही गुंड आमचा पाठलाग करत होते, असे असताना स्थानिक पोलिसांनी ते गस्त घालत होते असे सांगत त्यांची बाजू घेतली. या लोकांमुळे माझ्या कुटुंबाला मोठा धोका निर्माण झाला होता.”पुणे : पुण्यातील अभियंत्यावर ३० ते ४० जणांच्या टोळक्याकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुळशी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. इंजिनिअर तरुणाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ४० जणांनी काठी, रॉड, दगडांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पौड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुसगाव येथे राहणाऱ्या रवी करणानी या अभियंत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. हा प्रकार २९ सप्टेंबर रोजीचा लवळे गाव ते नांदे गाव दरम्यान घडला असल्याचे व्हिडीओमधून समोर आलं आहे.रवी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “रस्त्यावरील वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ४० जण लोखंडी रॉड, दगड आणि काठ्या घेऊन आमच्या गाडीवर हल्ला करत होते. दोन बाईकवरुन काही गुंड आमचा पाठलाग करत होते, असे असताना स्थानिक पोलिसांनी ते गस्त घालत होते असे सांगत त्यांची बाजू घेतली. या लोकांमुळे माझ्या कुटुंबाला मोठा धोका निर्माण झाला होता.”या घेटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याची चर्चा आहे. पोलिसांनी जरी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असला तरी आणखी दुसऱ्या कोणासोबत देखील हा प्रकार घडण्याची भीती आहे. याबाबत पोलिसांकडून उपायोजना करणे गरजेचे आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. पोलिसांचा कोणताही वचक गुन्हेगारांवर राहिला नसल्याचे अशा घटनावरून पाहायला मिळत आहे. त्यामुळे या गंभीर घटनेची दखल गृहमंत्र्यांनी घेणे गरजेचे आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याची चर्चा आहे. पोलिसांनी जरी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असला तरी आणखी दुसऱ्या कोणासोबत देखील हा प्रकार घडण्याची भीती आहे. याबाबत पोलिसांकडून उपायोजना करणे गरजेचे आहे.पुण्यात वाढती गुन्हेगारी
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. पोलिसांचा कोणताही वचक गुन्हेगारांवर राहिला नसल्याचे अशा घटनावरून पाहायला मिळत आहे. त्यामुळे या गंभीर घटनेची दखल गृहमंत्र्यांनी घेणे गरजेचे आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
Users Today : 22