बुलडाणा:-(शाहिद शाहा)
मागील अनेक दिवसांपासून धामणगाव बडे परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व्यापारी संघटना अध्यक्ष व प्रतिनिधी मौजे धामणगांव बढे येथील व्यापारी संघटनेनी धामणगाव बडे परिसरातील त्यांच्या व्यवसायावर गंभिर परिणाम होत असल्याबाबत व सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याची लेखी तक्रार वीज वितरण कंपनीच्या धामणगाव बडे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे ज्यामध्ये सतत विज खंडित होत असल्यामुळे दुकानदारांना आपले व्यवसाय बंद करावे लागत आहे यामुळे दैनंदिन उत्पन्न कमी होऊन ग्राहकसुध्दा नाराज होतात.ईलेक्ट्रॉनिक उपकरणे बिघडण्याची शक्यता वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.ग्राहकांची नाराजी वारंवार विज खंडित होत असल्याकारणाने ग्राहक नाराज होत आहेत. आणि दुसऱ्या दुकानात ज्यांचेकडे इनव्हेटर आहे त्यांचेकडे जाण्यास प्राधान्य देत आहे आम्ही विनंती करतो की,आपण या समस्येकडे लक्ष देउन वीज पुरवठा सुरळित होण्यासाठी वीज पुरवठा प्रणालीची नियमित दुरूस्ती व देखभाल करणेसाठी पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध करणे.आवश्यक असल्यास नविन ट्रॉन्सफार्मर बसविणे व विज खंडनाची कारणे शोधुन त्यावर तातडीने उपाय योजना करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन व्यापा-यांच्या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्याची मागणी मागणी करीत वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा तात्काळ दुरुस्ती करुन सुरळीत न केल्यास होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी वीज वितरण कंपनीची राहील असा इशारा व्यापारी संघटना अध्यक्ष व प्रतिनिधींनी धामणगाव बडे च्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांना दिला आहे.