गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता
शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ पिक विमा द्यावा व त्यांचा हिस्सा कंपनीकडे तात्काळ जमा करावा अन्यथा येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरू-डॉ.ऋतुजा चव्हाण
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
डोणगांव पोलीस स्टेशन हद्दीतील खरिपाचा सन २०२३-२४ चा पिक विमा न मिळालेले शेतकरी तसेच रब्बीचा पिक विमा न मिळालेले शेतकरी ४७५ शेतकऱ्यांनी आपले पीक विम्याचे अर्ज तक्रार म्हणून पोलीस स्टेशन अधिकारी अमरनाथ नागरे यांच्याकडे जमा केले व शेतकऱ्यांनी मागणी केली की पिक विमा कंपनीने आमची फसवणूक केली असून डॉ ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात व डाॕ.ऋतुजा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या देण्यात आला जोपर्यंत पिक विमा कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत एकही शेतकरी या ठिकाणाहून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी तक्रार देण्यासाठी आलेले शेतकरी संतोष धोंडीबा टाले,रामभाऊ प्रल्हाद लोणकर,विठ्ठल नथुजी काळदाते,नारायण वसंतराव कराळे, या चार शेतकऱ्यांना बोलावले व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यां सोबत चर्चा केली की आपण तक्रार द्या ती तक्रार घेऊन कायदेशीर कारवाईसाठी संबंधित विभागाला पत्र देऊन तसेच पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठांना सुद्धा पत्र देऊन याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी दिल्यानंतर शेतकरी शांत झाले यावेळी डाॕ.ऋतुजा चव्हाण यांनी सांगितले की राज्य सरकारने त्यांचा हिस्सा पिक विमा कंपनीकडे जमा करावा जेणेकरून तातडीने पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल तसेच राज्य सरकारने त्यांचा हिस्सा जमा न केल्यास रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करू यावेळी डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले की आम्ही आमचा हक्क मागतोय पिक विमा मिळवून घेणे हा शेतकऱ्याचा अधिकार आहे तब्बल दहा महिने झाल्यामुळे १२% व्याजासहित पिक विमा रक्कम मिळाली पाहिजे असा कायदा आहे.तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी शिफारस केल्याप्रमाणे नियमाने १८% व्याजदराने रक्कम मिळायला पाहिजे अन्यथा पीक विम्याचे कार्यालय ठिकाणावर ठेवणार नाही असा इशारा सहदेव लाड यांनी दिला असून ही लढाई एवढ्यावरच थांबणार नसून पिक विमा न मिळाल्यास शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन न्यायालयात याचिका दाखल करु शेतकऱ्यांना एक रुपयाही खर्च लागणार नाही असे ऋषांक चव्हाण म्हणाले.यावेळी देवेंन्द्र आखाडे,अरविंद दांदडे,गणेश धाबे,अनिल लांडगे,अविनाश टाले,नारायण कऱ्हाळे,शरद देशमुख,शंकरराव टाले, सलीम शहा,जावेद खाँसाब,मोहन चव्हाण,अदिनाथ लोकडे, गजानन टोन्चर,प्रभाकर शिंदे,रामेश्वर वायाळ,दिलीप टाले,राजू पळसकर,तेजराव देशमुख,उमेश वैद्य, रणजीतराव देशमुख, प्रभाकर शिंदे,रामेश्वर वायाळ,दिलीप टाले,राजू पळसकर,शेकडो शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.