सोयगाव ,प्रतिनिधी; गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे आज ग्रामपंचायत कार्यालयात राष्टपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. सत्य, अहिंसा, समानता, न्याय, तत्वांच्या माध्यमातून स्वतंत्र प्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे राष्टपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात केली.अहिंसा चे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चा नारा देणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान,भारतरत्न लाल बहाद्दूर शास्त्री यांचे जीवन चारित्र्य विद्यार्थ्यांनी वाचून त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा.जीवन कोलते यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले.
ग्रामपंचायत कार्यालयात येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच स्वातीताई भाऊराव पाटील तथा उपसरपंच मो.आरिफ मो लुखमान तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.मराठी शाळेचे शिक्षक भागवत गायकवाड, ग्रामसेवक सुधीर भालेराव होते तर अनुसूचित जाती जमातीचे तालुका अध्यक्ष सुनील माकोंडे उपस्थित होते.
सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
याप्रसंगी महात्मा गांधी चे जीवन कार्य या जिवन चात्रिया विषयावर ग्रा.म.पं.सदस्य मोहन सुरडकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अमोल राऊळकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन निखिल टिकारे यांनी केले.
याप्रसंगी बिटजमादार मिरखाँ तडवी,ग्रा.प.सदस्य सुनील शिप्पलक,ग्रामसेवक सुधीर भालेराव, शफी तडवी, जमाल तडवी, मा.ग्रा.प.सदस्य फकीराभाऊ तडवी, योगेश खैरे, टिकारे,ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष मानकर, आणिल राजपूत, संजय नप्ते शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.