मेहकर-(एजाज खान)
गुरुवारी मेहकरन जीक टोल नाक्याजवळ एका कारसमोर अचानक बकरीचे पिल्लू आले चालकाच्या सावधानतेमुळे अपघात टळला.त्यामुळे समृद्धी महामार्गावर आवश्यक त्या उपायोजना करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.शिंदे सेनचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर हे गुरुवारी वाशिम येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.परत येत असताना मेहकर जवळील टोल नाक्यालगत अचानक बकरीचे पिल्लू त्यांच्या वाहनासमोर आले.परंतू वाहनचालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात होता होता टळला अन्यथा विनाकारण नाहक जीवांचा बळी गेला असता याबाबत शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर यांनी हेल्पलाईनलाही कॉल केला; परंतु तो उचलला गेला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा समृध्दी महामार्गावरील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचा निष्काळजीपणा अधोरेखित झालेला असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांच्या कुटूंबाचा आधार हिरावल्या जाऊ शकतो याबाबत ते अनभिज्ञ तर नाहीत ना किंवा सदर अधिकारी व कर्मचारी असंवेदनशील तर नाहीत ना असा प्रश्न आपसुकच निर्माण झाला आहे
याबाबत आमच्या प्रतिनिधीने राजेंद्र गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तूंम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला पाहिजेत होती अशा प्रकारे उध्दटपणे प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगत जर माझे संपूर्ण कुटूंबच उध्वस्त झाले असते तर या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी कुणी घेतली असती अशी प्रतिक्रिया दिली