गोंदिया शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रांतील सक्रिय महिलांचा पक्षात सहभाग
गोंदिया | राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभागाच्या वतीने आज गोंदिया शहरातील रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्षा सौ. राजलक्ष्मी तुरकर, तसेच शहर महिला अध्यक्षा डॉ. माधुरी नासरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत लाडकी बहिण योजना, पिंक रिक्षा योजना, एस.टी. प्रवासातील महिला सवलत योजना यांसह महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी यावेळी सांगितले की, “महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सशक्ततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच बांधील राहिली असून खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात हे कार्य अधिक व्यापक होईल.”

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील महिला संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. प्रत्येक वॉर्डात महिलांची सभासद नोंदणी वाढवून त्यांच्या सहभागाला चालना देण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीदरम्यान, गोंदिया शहरातील विविध वयोगटातील आणि पार्श्वभूमीतील तब्बल ६० पेक्षा अधिक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या महिलांमध्ये संगीता गंगभोज, सुनीता कोहडे, मनीषा गौतम, धनवंता गौतम, इम्तियाज खान, बिस्मिल्लाह शेख, लष्मी कोहडे, सरोज कोहडे, प्रमिला कुकडे, रेखा कोहडे, विधा राउत, सावित्री येरपुढे, ललिता रोकडे, योगिता माटे, कोमल इटकरे, राखी मानकर आदींचा समावेश होता.
या सर्व नवप्रवेशित महिलांचे पक्षात स्वागत करत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पक्षाच्या कार्यामध्ये सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले.

बैठकीस देवेंद्रनाथ चौबे, नानू मुदलियार, कुंदा दोनोडे, सविता मुदलियार, मालती कापसे, कुंदा पंचबुधे, मोरेश्वरी बिसेन, अशा अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
बैठकीने गोंदिया शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस संघटनेला नवीन ऊर्जा प्राप्त झाली असून, महिला वर्गाचा वाढता प्रतिसाद हा पक्षासाठी सकारात्मक संकेत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
Users Today : 18