महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक उभारणीबाबत बैठक
सातारा, 23 सप्टेंबर –
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा येथील दत्त निवास, बंगला क्रमांक ०१, सदर बाजार या वास्तूवर राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक घेण्यात आली.
ही बैठक सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह अन्य मान्यवर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत स्मारक उभारणीसंदर्भातील प्राथमिक रूपरेषा, पुढील प्रक्रिया आणि शासन स्तरावर होणाऱ्या कार्यवाहीबाबत चर्चा झाली.

Users Today : 27