दोंडाईचा प्रतिनिधी ;-
नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती नाशिक विभागीय मंडळाचे सहसचिव मच्छिद्र कदम यांनी दिली.
या परीक्षांच्या तयारीसंदर्भात मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची आढावा बैठक दोंडाईचा येथील अहिंसा स्कूलमध्ये पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. मच्छिद्र कदम होते.
उपस्थित मान्यवर
बैठकीत नंदुरबारचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे,
धुळे शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी वासंती पवार,
नाशिक मंडळाचे अधिकारी संजय बोरसे,
ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे प्रशासकीय अधिकारी गणेश चव्हाण,
नूतन माध्यमिक व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.सी. पाटील,
नूतन विद्यालयाचे समन्वयक डी.एम. चौधरी,
आरडीएमपी कॉलेजचे प्राचार्य संजय चंदने,
जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी,
कार्याध्यक्ष कुंदन पाटील,
तसेच अहिंसा स्कूलच्या प्राचार्या उषा मनोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सीसीटीव्ही देखरेखीवर भर
बैठकीत परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी सीसीटीव्ही बसविण्याची गरज, देखरेख नियोजन आणि तांत्रिक साधनांचा वापर यावर सविस्तर चर्चा झाली.
मच्छिद्र कदम म्हणाले –
“सुरक्षित, भयमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर अत्यावश्यक आहे. प्रत्येक शाळेने आपल्या सुविधा अद्ययावत ठेवून परीक्षेच्या काळात शिस्तबद्ध वातावरण निर्माण करावे.”
मुख्याध्यापकांची जबाबदारी व सहयोगावर भर
शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी सांगितले की –
“मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकजुटीने कार्य करत शांत, निःपक्ष वातावरणात परीक्षा पार पाडावी.”
तर विस्तार अधिकारी वासंती पवार यांनी केंद्रांच्या तयारीबाबत मार्गदर्शन करत समन्वयातून परीक्षा सुरळीत होण्यासाठी सूचना दिल्या.
मुख्याध्यापकांचा एकमुखी पाठींबा
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व उपस्थित मुख्याध्यापक व प्राचार्यांनी कदम आणि अहिरे यांनी मांडलेल्या सूचनांना एकमुखी पाठींबा व्यक्त केला, तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.
दहावी-बारावी परीक्षा ‘कॉपीमुक्त’ करण्यासाठी सीसीटीव्हीची नजर नाशिक विभागीय मंडळाचा निर्धार — दोंडाईचा येथे आढावा बैठक; सुरक्षित व पारदर्शक परीक्षा घेण्यावर भर
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment