नवीन वर्ष 2026 सुरू होताच अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांमुळे सामान्यांना थेट आर्थिक परिणाम होऊ शकतो. आधार-पॅन लिंकिंगपासून व्याजदरापर्यंत, एलपीजी आणि क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत बरेच महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत.
1. आधार-पॅन लिंकिंग
31 डिसेंबर 2025 ही आधार-पॅन लिंकिंगची अंतिम मुदत आहे. या तारखेपर्यंत लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील बँक व्यवहार, आयकर भरणे आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी येऊ शकतात.
2. व्याजदरात बदल
अनेक बँकांनी नव्या वर्षात एफडी आणि इतर योजनांवरील व्याजदरात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. 1 जानेवारीपासून या बदलांचा प्रभाव जाणवेल. मात्र, हा व्याजदर वाढेल की कमी होईल, हे अद्याप निश्चित नाही.
3. एलपीजी आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर
1 जानेवारीपासून एलपीजी गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार आहे. याच दिवशी विमानइंधनाचे नवीन दर देखील जाहीर होतील. त्यामुळे विमानप्रवास महाग किंवा स्वस्त होईल, हे या बदलांवर अवलंबून राहील.
4. क्रेडिट कार्डच्या नियमात बदल
भारतीय बँका आपले क्रेडिट कार्ड नियम अपडेट करणार आहेत. यात वार्षिक फी, व्याजदर किंवा अन्य शुल्कांमध्ये बदल होऊ शकतो. सामान्य ग्राहकांनी याबाबत लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
Users Today : 8