गावोगावी होत असलेली मोठी गर्दी, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जनतेचा थेट सहभाग यामुळे अपक्ष उमेदवार दारासिंग वामन राठोड यांचा प्रचार सध्या चर्चेचा आणि वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजचा विषय ठरत आहे. भारतीय जनता पार्टीत तब्बल वीस वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही तिकीट नाकारण्यात आल्याने अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले राठोड हे आता निष्ठा विरुद्ध सत्तेचे राजकारण या लढतीचे प्रतीक बनले आहेत.
“पक्ष नव्हे, माणूस आणि काम महत्त्वाचं” हा संदेश सावळदबारा गणातील शिकलेली तरुणाई, सामान्य मतदार आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर उचलून धरला जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. देव्हारी तांडा ते मोलखेडा या प्रत्येक गावात राठोड यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता पक्षीय रणनीती अपयशी ठरत असल्याची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे.
विकास, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, रोजगार आणि तरुणांचे प्रश्न यावर राठोड यांनी घेतलेली निर्भीड व थेट भूमिका मतदारांना भावत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या सभांना आणि प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, प्रचारात जनसहभाग लक्षणीय वाढल्याचे चित्र आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, सावळदबारा गणाचा निकाल हा केवळ एका जागेपुरता मर्यादित राहणार नसून तो सोयगाव तालुक्याच्या राजकारणाला हादरवणारा ठरेल. या सगळ्या घडामोडींमध्ये अपक्ष उमेदवार दारासिंग वामन राठोड हेच निर्णायक ‘गेम-चेंजर’ ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Users Today : 16