बुलढाणा जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा – जिल्ह्यातील किन्होळा, गणेशपुर आणि जानेफळ या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्यातील विविध केंद्रीय परीक्षकांनी आरोग्य केंद्रांची तपासणी करून अहवाल केंद्रीय समितीस सादर केला होता.

तपासणीत तातडीच्या उपचारांची गुणवत्ता, रुग्ण रेफरची प्रमाण, प्रसूती सेवा, परिसर स्वच्छता, उद्यान, अत्याधुनिक उपकरणांचा वापर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अशा बाबींवर विशेष लक्ष दिले गेले. अहवालानुसार बुलढाणा जिल्ह्यातील या तीन आरोग्य केंद्रांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवली, तर उर्वरित दोन केंद्रांचे अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात, जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ. अमोल गीते यांनी वेळोवेळी आरोग्य केंद्रांना भेट देऊन मार्गदर्शन केले. याशिवाय, जिल्हा गुणवत्ता आश्वासन टीम मधील नोडल अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती शितल साखळीकर, कार्यक्रम सहाय्यक श्री अमर राठोडआधार फाउंडेशन, जालना यांनी आरोग्य केंद्रांना भेट देऊन सुधारणा सुचवल्या.

राष्ट्रीय मानांकनासाठी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली;

  • चिखली – डॉ. ऋषिकेश कणखर, डॉ. अनुराधा गारोडे

  • किन्होळा – प्रा. आ. केंद्र टीम

  • खामगाव – डॉ. अभिलाष खंडारे, डॉ. बी. एस. तेलंग

  • गणेशपुर – प्रा. आ. केंद्र टीम

  • मेहकर – डॉ. विजय बलकार, डॉ. सूरज ठाकरे

  • जानेफळ – प्रा. आ. केंद्र टीम

या यशाबद्दल डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गुट्टे, जिल्हा हिवताप अधिकारी श्री शिवराज चव्हाण आणि सर्व आरोग्य विभागाने अभिनंदन केले आहे.

उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केंद्रीय आयुष्य, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना. प्रतापराव जाधव यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

0 9 2 6 4 1
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *