आमदार Rohit Pawar यांनी दिल्लीमध्ये Arvind Kejriwal यांची भेट घेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चर्चा केली. या भेटीत अपघातासंदर्भातील विविध मुद्द्यांची माहिती केजरीवाल यांना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभेसाठी जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या दुर्घटनेत कोणीही बचावू शकले नाही. या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी Sunetra Pawar यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली तसेच पक्षाची जबाबदारीही स्वीकारली. या घटनेमुळे पवार कुटुंबासह राज्यभरात शोककळा पसरली.
दरम्यान, राज्याचा अर्थसंकल्प Devendra Fadnavis यांनी मांडला. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावूक झाल्याचेही दिसून आले. इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री स्वतः राज्याचा अर्थसंकल्प मांडत असल्याची चर्चा झाली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत VSR कंपनीच्या विमानाचा उल्लेख करत रोहित पवार यांनी अनेक संशय व्यक्त केले आहेत. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचाही प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या विविध तपास यंत्रणांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.
रोहित पवार यांनी सांगितले की, “अजित पवार यांना न्याय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. दादांच्या अपघाताविषयीची सर्व माहिती मी केजरीवाल यांना दिली आहे. महाराष्ट्रात पोलिस एफआयआर दाखल करून घेत नाहीत आणि तपासही संथ गतीने सुरू आहे.”
तसेच पुढील काही दिवसांत ते Akhilesh Yadav आणि Tejashwi Yadav यांच्यासारख्या देशातील इतर महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Users Today : 29