जन औषधी हे केवळ औषधांपुरते मर्यादित नसून जनसहभागातून उभा राहिलेला एक सशक्त आणि व्यापक आरोग्य अभियान आहे.
आदरणीय पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणारी Pradhan Mantri Bharatiya Janaushadhi Pariyojana योजना देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण औषधे पोहोचवण्याच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल ठरली आहे.
“स्वस्त औषध, चांगले औषध” या संकल्पनेतून निरोगी, समृद्ध आणि सक्षम भारत घडवण्याचा आपला सामूहिक संकल्प अधिक बळकट होत आहे.
आज हा उपक्रम देशातील कोट्यवधी कुटुंबांना आर्थिक दिलासा देत असून त्यांना अधिक चांगली आरोग्य सुरक्षा प्रदान करत आहे. जन औषधी केंद्रांमुळे सामान्य नागरिकांना कमी किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध होत असल्याने आरोग्य सेवांमध्ये मोठा सकारात्मक बदल घडत आहे.
Users Today : 29