चिखली मतदारसंघात रस्ते विकासकामांना गती; तेल्हारा फाटा, पेठ, उत्रादा, धोत्रा भनगोजी व शेलसूर येथे पाहणी

KHOZ MASTER
2 Min Read

चिखली (प्रतिनिधी) :


चिखली मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने सुरू असलेल्या धोडप – पेठ – एकलारा – अंबाशी – चंदनपूर रस्ता (रामा 439, साखळी क्र. 0/00 ते 29/00) सुधारणा कामाची आज सविस्तर पाहणी करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात मौजे तेल्हारा फाटा, पेठ, उत्रादा, धोत्रा भनगोजी आणि शेलसूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन रस्ते विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्या हे काम प्रगतिपथावर आहे. पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून कामाची सद्यस्थिती, दर्जा, निधीची उपलब्धता आणि काम पूर्ण होण्याची अपेक्षित मुदत याबाबत माहिती घेण्यात आली.

यावेळी कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड चालणार नाही, अशी स्पष्ट सूचना देत काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनीही स्थानिक समस्या आणि सूचना मांडल्या.

दरम्यान या विकास पाहणी दौऱ्याचे प्रत्येक गावात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

या दौऱ्यात संजय गाडेकर (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), डॉ. कृष्णकुमार सपकाळ (तालुका अध्यक्ष, भाजप), नीरज गायकवाड (तालुका अध्यक्ष, युवा मोर्चा), तहसीलदार विजय सवडे, उपविभागीय कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी समाधान वाघ, गणेश भगुरे, डॉ. गुलाबराव सपकाळ, लक्ष्मणराव शेळके, शैलेश अंभोरे, कृष्णा चौथे, सौ. सिंधू तायडे (माजी सभापती), श्रीनिवास, विजय आडचुळे (एमएसआरडीसी), रमेश इंगळे (सरपंच), बळीराम काळे, गुलाबराव सोनारे (सरपंच), विष्णू शेळके (सरपंच), लक्ष्मण रिंढे, गजानन रिंढे, विशाल नेमाने, बंडू पाटील गायकवाड, अंकुश तायडे यांच्यासह विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, बूथप्रमुख आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 3 8 6 0
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *