अकोट प्रतिनिधी :
अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आणि कोणत्याही परिस्थितीत वीज सेवा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या लाईनमन बांधवांचा सन्मान करण्यासाठी ४ मार्च रोजी महावितरणच्या अकोट विभागीय कार्यालयात ‘लाईनमन दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोट विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुटे होते. तर या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय मिसाळ उपस्थित होते. यावेळी उपकार्यकारी अभियंता सतीश नंदवंशी (उपविभाग अकोट) आणि सुदेश नवलकार (उपविभाग तेल्हारा) यांची विशेष उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन व सुरक्षा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात
या सन्मान सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन, सुरक्षा साधनांचे पूजन आणि केक कापून करण्यात आली. वीज क्षेत्रात काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
सन्मानित लाईनमन
या कार्यक्रमात खालील तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला:
प्रकाश जामकर, नरसिंग चंदन, विनोद चहाकार (मुख्य तंत्रज्ञ), तुळशीराम चव्हाण, विजय गोरे, अर्चना गडम, सुनंदा काळे, शबानाबी अब्दुल रहेमान, सिद्धधोन दारोकार, निलेश दिंडोकार, शेख गफूर शेख, अजय गजभिये, दीपक हैंड आदींचा सन्मान करण्यात आला.
नव्याने रुजू कर्मचाऱ्यांना स्नेहभेट
अकोट विभागात नव्याने रुजू झालेल्या विद्युत सहाय्यकांना दीपक नागे (उपव्यवस्थापक – मानव संसाधन) यांनी स्वतःच्या खर्चाने पेंचिस व टेस्टर स्नेहभेट म्हणून दिले.
तसेच विभागातील सर्व लाईनमन बांधवांना गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली मनोगते
कार्यक्रमात योगेश वाकडे, अनिकेत माने, रोशन अढाऊ, सुनील सुलताने, मंगेश कवले, सुपेश तायडे, अफसर शहा, सूरज चांदूरकर, मयुर अढाऊ, ऐश्वर्या बेराड, निकिता सातारकर, उद्धव अढाऊ, विशाल अढाऊ, अभिषेक शिरसाट, प्रवीण इंगळे आणि धीरज सरोदे यांनी लाईनमन बांधवांच्या कार्याचे कौतुक केले.
तसेच सुरक्षिततेचे नियम पाळून काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
विविध उपक्रमांचे आयोजन
लाईनमन दिनानिमित्त कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
-
रांगोळी स्पर्धा
-
कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
अकोट येथील डॉ. निखिल धांडे (धांडे हॉस्पिटल) यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या उपक्रमात कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मोठ्या संख्येने उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रस्ताविक दीपक नागे, सूत्रसंचालन अरुण दावले आणि आभार प्रदर्शन सिद्धधोन दारोकार यांनी केले.
यावेळी विभागातील सर्व संघटना, शिकाऊ उमेदवार, बाह्य स्त्रोत कर्मचारी, सुरक्षा रक्षक, रीडिंग एजन्सीचे कर्मचारी तसेच अकोट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकोट विभाग नियोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.
Users Today : 23