बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळत नाही? येथे करा तक्रार; कंपन्यांचे हेल्पलाईन नंबर जाहीर

KHOZ MASTER
2 Min Read

भारतामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांना बुकिंग करूनही सिलेंडर वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.

सरकारकडून गॅस टंचाई नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ग्राहकांना बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याची ओरड आहे. पहाटेपासून एजन्सीसमोर रांगा लागत असून काही ठिकाणी डिलिव्हरी उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच काही डिलिव्हरी बॉय अतिरिक्त पैसे मागत असल्याचाही आरोप केला जात आहे.

दरम्यान, घरगुती LPG सिलेंडरच्या बुकिंगसाठीचा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवस करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा कालावधी ४५ दिवस करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत ग्राहकांना थेट गॅस कंपन्यांकडे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

☎️ गॅस कंपन्यांचे हेल्पलाईन नंबर

HP Gas

  • 1800-2333-555 (टोल फ्री)
  • 9493602222 (HP Anytime LPG)

Bharat Gas

  • 1800-22-4344 (टोल फ्री)
  • 7715012345 (LPG बुकिंग)

Indane Gas

  • 1800-2333-555 (टोल फ्री)
  • 7718955555 (बुकिंग आणि तक्रार)

📱 व्हॉट्सॲपवरूनही करा बुकिंग

Indane Gas:
अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक 7718955555 वर “LPG Refill” असा संदेश पाठवून बुकिंग करता येते.

HP Gas:
9222201122 या क्रमांकावर “HI” असा संदेश पाठवून व्हॉट्सॲप सेवा सुरू करता येते. त्यानंतर बुकिंग, पेमेंट आणि डिलिव्हरीची माहिती मिळू शकते.

ग्राहकांना २४x७ ही सुविधा उपलब्ध असून या माध्यमातून तक्रार नोंदवून गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत मदत मिळू शकते. ⛽📞

0 9 4 0 5 8
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *