बुलढाणा प्रतिनिधी :
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधन टंचाईची शक्यता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरचे महत्त्व वाढले असताना शहरातील TB Hospital Buldhana येथे चोरीची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी टीबी हॉस्पिटलच्या स्वयंपाकघराची खिडकी व दरवाज्याची कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाकघरात ठेवलेल्या १७ गॅस सिलिंडरपैकी एक भरलेला सिलिंडर तसेच काही साहित्य चोरून नेण्यात आले.
इतकेच नव्हे तर चोरट्याने हॉस्पिटलमधील तांब्याची ऑक्सिजन पाइपलाइन देखील काढून नेल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक Dr. Sushil Chavan यांनी दिली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Users Today : 12