लाडकी बहीण योजनेतून महिलांना मोठं गिफ्ट; एप्रिलमध्ये खात्यात ३ हजार रुपये जमा 💰

KHOZ MASTER
2 Min Read

मुंबई :

राज्य सरकारच्या Mukhyamantri Ladki Bahin Yojana अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र काही महिन्यांपासून पैसे जमा होण्यात विलंब होत असल्याने महिलांमध्ये नाराजी होती.

आता मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे मिळून एकूण हजार रुपये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे या योजनेच्या हप्त्यांमध्ये काही प्रमाणात विलंब झाला होता. त्यामुळे थकबाकीचा हप्ता आता एकाच वेळी देण्याची तयारी शासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

केवायसी अनिवार्य; ३१ मार्चपर्यंत मुदत 

दरम्यान, काही अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने लाभार्थ्यांसाठी केवायसी (KYC) प्रक्रिया सक्तीची केली आहे. यासाठी सुरुवातीला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

मात्र अनेक महिलांच्या केवायसीमध्ये तांत्रिक चुका असल्यामुळे त्या दुरुस्त करण्यासाठी आता ३१ मार्च २०२६ पर्यंत अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण झाल्यास संबंधित महिलांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे.

योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री

राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच ही योजना भविष्यातही सुरू राहील आणि बंद होणार नाही, असे आश्वासन Devendra Fadnavis यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिले आहे.

यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांना या योजनेचा मोठा आधार मिळत असून एप्रिल महिन्यात मिळणाऱ्या हजार रुपयांच्या दुहेरी हप्त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 9 4 1 3 6
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *