खामगाव –
पवित्र रमजान महिना हा संयम, त्याग आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा महिना असून या महिन्यात मुस्लीम समाज रोजे ठेवून अल्लाहची इबादत करतो. तसेच गरजूंना मदत, दानधर्म आणि बंधुभाव वाढविण्यावर विशेष भर दिला जातो. रमजान हा केवळ उपवासाचा महिना नसून मानवता, एकात्मता आणि शांततेचा संदेश देणारा महिना आहे. त्यामुळे समाजात एकोपा आणि बंधुभाव वाढण्यास प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
खामगाव येथील मस्तान चौक मस्जिद समोरील प्रांगणात राणा फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा सरस्वती खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष बिलाल खान पठान, संजय शर्मा, नगरसेवक तहेसीन शाह, अजीम कुरेशी, केशव कापले, शमीसेठ कुरेशी, सलीम पत्रकार, सैयद इमरान, मुकद्दर खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय अन्सार भाई, काकू पठान, हाफीज साहेब, अजीज चायवाले, वाजीद कुरेशी, अंजुम पठान, इसाक आझाद, श्याम मोरे, तुषार चंदेल, अविनाश ढगे, वैभव वानखडे, हाजी सलीम मकवाना यांच्यासह हिंदू-मुस्लीम समाज बांधव, शांतता समितीचे सदस्य, पत्रकार तसेच आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोजा इफ्तार कार्यक्रमातून सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला.
Users Today : 3