अमरावती –
एका अल्पवयीन
मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. तिला मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना गुरुवार, १६ एप्रिल रोजी सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मोसीम शाहा मुस्तकीम शाहा (२४) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय मुलगी ही घरी एकटी होती. त्यावेळी मोसीम शाहा हा तिच्याकडे आला. तू मला खूप आवडते, मी तुझ्यावर प्रेम करतो, असे
पीडितेला दिली मारण्याची धमकी
सरमसपुरा ठाण्याच्या हद्दीतील घटना
म्हणून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने तू मला सोडून दे, असे त्याला म्हटले. त्यावर त्याने तिला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीने सरमसपुरा ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी मोसीम शाहा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Users Today : 15