अल्पवयीन मुलींच्या शोषण प्रकरणातील आरोपीचा वाढदिवस साजरा केल्याने खळबळ; पोलीस अधिकारी व दोन अंमलदार निलंबित

KHOZ MASTER
1 Min Read

अमरावती

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपी *Ayan Ahmed* याचा वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एक पोलीस अधिकारी व दोन अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

तपासात आरोपी अयान अहमद याने पीडित मुलींच्या शोषणासाठी अमरावती शहरातील भाड्याच्या फ्लॅटचा वापर केल्याचे समोर आले आहे. तसेच तो सात ते आठ वेळा त्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास होता, असेही निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी संबंधित फ्लॅटची झडती घेऊन पंचनामा केला असून मालकाला चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावतीचे पोलीस अधीक्षक *Vishal Anand* यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वाढदिवस साजरा करणाऱ्या परतवाडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह दोन अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे.

तपासादरम्यान अयान अहमद हा पीडित मुलींना विविध कॅफे व धरण परिसरातील उद्यानांमध्ये भेटल्याचेही समोर आले आहे. या सर्व ठिकाणांचे पोलिसांनी पंचनामे केले आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत सुमारे १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सायबर पोलिसांच्या मदतीने सोशल मीडियावरील ४१ अकाउंट डिलिट करण्यात आली आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला आहे. पीडितांचे नाव व ओळख गोपनीय ठेवून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून पीडितांनी पुढे येऊन जबाब द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 9 6 5 0 0
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *