जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळा नायगाव बु. तर्फे महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रम आणि अनोख्या अभिवादनाने साजरी….

KHOZ MASTER
1 Min Read

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्यावर जि.प.मराठी शाळा नायगाव बु. येथे दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सतत अभ्यास उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात शिक्षण घेत असताना शिष्यवृत्तीचा कालावधी कमी असल्यामुळे आपले शिक्षण पुर्ण करता यावे यासाठी १८-१८ ते २१-२१ तास अभ्यास करून आपले शिक्षण पुर्ण केले. या डॉ. बाबासाहेबांच्या ज्ञान साधनेची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी १४ एप्रिल २०२६ रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीच्या वेळी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात संपूर्ण गावचा परिसर दुमदुमला. प्रभात फेरीनंतर शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तदनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.

याप्रसंगी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी गावातील आजी-माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, आजी-माजी सरपंच, आजी-माजी तंटामुक्ती अध्यक्ष पोलिस पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता ५ वी ची विध्यार्थिनी आदिती आंभोरे हिने केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनी मेहनत घेतली.

0 9 6 3 9 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *