पुणे हादरले! वकिलाच्या कार्यालयात महिला सेक्रेटरीची हत्या; पत्नी व अल्पवयीन मुलगी अटकेत

KHOZ MASTER
2 Min Read

पुणे –

शहरातील Chandan Nagar परिसरात धक्कादायक घटना घडली असून एका वकिलाच्या कार्यालयात त्याच्या महिला सेक्रेटरीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वकिलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीला अटक केली असून वकिलालाही सहआरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे.

मृत महिलेचे नाव पूनम दिनेश मून (वय ३२) असून ती Yerwada येथे राहणारी होती. ती गेल्या साडेतीन वर्षांपासून वकील Sanjay Sawant यांच्या कार्यालयात सहाय्यक व सेक्रेटरी म्हणून काम करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी पूनम नेहमीप्रमाणे कामावर आली होती. वकिलाची पत्नी Swati Sawant हिला पूनम आणि तिच्या पतीमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून स्वाती सावंत आणि तिच्या अल्पवयीन मुलीने पूनमचे हात-पाय बांधून तिला बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.

मृतदेह गोणीत भरून लपवण्याचा प्रयत्न

गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत पूनम घरी न परतल्याने तिचा पती दिनेशने वकील संजय सावंत यांना फोन केला. त्यावेळी सावंत यांनी पूनम कदाचित मैत्रिणीकडे गेली असेल असे सांगत दिशाभूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेश सावंत यांच्या जुन्या मुंढवा रोडवरील कार्यालयात गेला. कार्यालयाचे शटर उघडे असल्याने त्याने आत जाऊन पाहिले असता पूनमचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मृतदेह गोणीत भरून लपवण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

वकिलावरही गुन्हा

पोलिसांच्या माहितीनुसार, वकील संजय सावंत हे मारहाणीत थेट सहभागी नव्हते. मात्र गुन्हा लपवण्याचा प्रयत्न, माहिती दडवणे आणि मृत महिलेच्या पतीची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Police अंतर्गत Chandan Nagar Police Station आणि गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासांत या खुनाचा उलगडा केला.

0 9 6 3 9 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *